DSK Events

<< Back to Events

DSK Group’s major role in Make In India…

‘मेक इन इंडिया’मध्ये डीएसकेंची गुंतवणूक…
मित्रहो…या देशावर, या महाराष्ट्रावर आणि माझ्या पुण्यावर अतोनात प्रेम करणारा मी माणूस. त्यामुळेच उद्योगक्षेत्रात मी अनेक जगावेगळी धाडसं केलीत आणि ते सारे उद्योग आपल्याच राज्यात सुरू करून पहिल्या क्रमांकावरच ठेवले आहेत. ही माझी बढाई नाही…तर मराठी माणसानं ठरवलं तर तो जगाला गवसणी घालू शकतो…हे मला तरूणांच्या मनात बिंबवायचं आहे. आता तर ‘मेक इन इंडिया’द्वारे सरकारच उद्योगजगताला चालना देत आहे…ही बाब मला फारच भावली. आपल्या महाराष्ट्रातही उद्योगांनी यावं…या आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मीही आनंदाने होकार दिला. याअंतर्गत आमची डीएसके मोटोव्हील्स ही कंपनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक येथे रू. 500 करोडचा वाहन उत्पादन उद्योग सुरू करणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक रू.120 कोटींची असून मार्च 2018 पर्यंत हा उद्योग कार्यान्वित होणार आहे. ज्यातून 1000जणांना थेट रोजगार मिळेल. अप्रत्यक्ष रोजगाराचा आकडा याहीपेक्षा जास्त असेल. यासाठी आवश्यक त्या परवानग्या, नोंदण्या, सुविधांसाठी सरकार सहकार्य करणार आहे. यासंदर्भात डीएसके मोटोव्हील्स तर्फे शिरिष कुलकर्णी व शासनातर्फे प्रशासकीय अधिकार्यांनी काल सामंजस्य (MOU)वर स्वाक्षर्या केल्या. याप्रसंगी माझ्या समवेत महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.-डी एस के